विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ritu Tawde चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झालेल्या प्रकरणातील बृहन्मुंबई महानगरपालिकेचा चौकशी अहवाल मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी फेटाळून लावत नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या नव्या चौकशी समितीत दोन नगरसेवकांचा समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.Ritu Tawde
महापालिकेच्या चौकशी अहवालात रस्ते कामाचे कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागाराला जबाबदार धरत, महापालिकेच्या रस्ते व उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र, हा अहवाल महापालिकेच्या सभागृहात एकमताने फेटाळण्यात आला.Ritu Tawde
याबाबत बोलताना महापौर ऋतु तावडे म्हणाल्या, महापालिकेने हा अहवाल नाकारला असून आम्ही त्याची प्रत फाडून टाकली आहे. प्रशासनाने नव्याने चौकशी करावी आणि त्यासाठी दोन नगरसेवकांचाही समितीत समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
30 जून रोजी चेंबूरमध्ये रस्त्यालगतचे मोठे झाड शाळेच्या बसवर कोसळल्याने 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बीएमसीने चौकशी समिती नेमली होती.
महापौरांनी मृत मुलाच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत चौकशी अहवालात नमूद करण्यात आलेल्या 7 लाखांच्या नुकसानभरपाईवरही तीव्र आक्षेप घेतला. मी स्वतः एक आई आहे. एका निष्पाप मुलाचा जीव गेला आणि त्याची किंमत फक्त 7 लाख ठरवली जाते, हे अजिबात मान्य नाही. पावसाळ्यापूर्वी मी स्वतः त्या रस्त्याची पाहणी करून धोकादायक झाडांबाबत अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी चौकशी समितीने संबंधित रस्ते कंत्राटदारावर 5 लाख आणि देखरेख करणाऱ्या सल्लागारावर 2 लाखांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली होती. मात्र, BMCच्या अधिकाऱ्यांचा कोणताही निष्काळजीपणा नसल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला होता. आता नव्या चौकशीत नेमके कोण जबाबदार ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mayor Ritu Tawde Rejects BMC Report on Chembur Tree Accident, Orders Fresh Probe
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा