Navneet Rana : रामरक्षेची आठवण आता का? उद्धव ठाकरे पक्षरक्षा करत आहेत, नवनीत राणा यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

अमरावती : Navneet Rana पक्षातील आमदार, खासदार सोडून गेल्यानंतर आता त्यांना रामलल्ला आणि रामरक्षेची आठवण झाली आहे. ते रामरक्षा करत नाहीत, तर उरलेल्या पक्षाची पक्षरक्षा करत आहेत, अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली..Navneet Rana

राणा म्हणाल्या, “जेव्हा अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहिले आणि देशभरातून भाविक दर्शनासाठी गेले, तेव्हा उद्धव ठाकरे कुठे लपले होते? पक्षातील आमदार, खासदार सोडून गेल्यानंतर आता त्यांना रामलल्ला आणि रामरक्षेची आठवण झाली आहे. ते रामरक्षा करत नाहीत, तर उरलेल्या पक्षाची पक्षरक्षा करत आहेत.”Navneet Rana

हनुमान चालीसा प्रकरणाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, “हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितल्यामुळे मला १४ दिवस तुरुंगात राहावे लागले. आज तेच जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. त्यांनी अमरावतीतील आमच्या हनुमानगढीवर यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू आणि एकत्र हनुमान चालीसाचे पठण करू.”Navneet Rana



 

आरएसएस मुख्यालयात जाऊन नतमस्तक व्हा

नागपुरात रामरक्षा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन दर्शन घ्यावे आणि नतमस्तक व्हावे, असा सल्लाही राणा यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कोणताही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार नाहीत, असेही त्यांनी टोला लगावत म्हटले.

“श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत होते” या एका मौलानाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राणा म्हणाल्या, “हिंदू धर्म हजारो वर्षे जुना आहे. आम्ही श्रीकृष्णाला नेहमी तिलक लावलेलेच पाहिले आहे. त्यामुळे संबंधित मौलानाने आधी स्वतः कपाळावर तिलक लावून नमाज पठण करावे आणि मग आमच्या श्रद्धास्थानांवर बोलावे.”

अयोध्या राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. “राम मंदिर होऊ न देणाऱ्या काँग्रेसला यावर बोलण्याचा अधिकार नाही. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या भूमिकेवर पंतप्रधान ठाम आहेत. राम मंदिरात चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोफत साडी योजना बंद झाल्याच्या प्रश्नावर राणा म्हणाल्या की, सरकारने शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना आणि निराधार योजनांसाठी निधी वाढवला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे साडी योजना थांबली असली तरी सरकार महिला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाच्या दिवशी, १८ जुलै रोजी अमरावतीतील हनुमानगढी येथे नवनीत राणा हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, “माझी भक्ती कोणाला उत्तर देण्यासाठी नाही. तुरुंगात घालवलेले १४ दिवस मी आणि माझ्या कुटुंबाने अनुभवले आहेत, ते आम्ही कधीही विसरणार नाही.”

Why Remember Ram Raksha Now? Uddhav Thackeray Is Protecting His Party, Not Faith: Navneet Rana

महत्वाच्या बातम्या