घशाच्या सूजेमुळे सुप्रिया सुळे यांना बोलणे टाळण्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घशाला किरकोळ सूज आल्याचे निदान झाले असून, डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना बोलणे टाळण्यास सांगण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून आपल्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी प्रसिद्ध कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने यांचा सल्ला घेतला.

तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या घशाला थोडी सूज असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सुळे यांना पुढील दीड आठवडा भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्यावर व्हॉइस थेरपी करण्यात येणार आहे.

“माझ्या घशाला थोडी सूज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, पूर्ण आवाज विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मी व्हॉइस थेरपीही घेणार आहे,” असे सुळे यांनी सांगितले. उपचारांच्या काळात समर्थक आणि नागरिकांनी समजून घ्यावे, असे आवाहन करत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Supriya Sule Advised Voice Rest After Throat Swelling

महत्वाच्या बातम्या