विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी सर्व खासदारांना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी सीजेपीचे समर्थक संसद भवनाजवळ पोहोचले होते. आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर संसदेतील सुरक्षा वाढवण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. जमाव पांगला. बाहेर हा गोंधळ सुरू असताना पंतप्रधानांसह सर्व खासदार संसदेत उपस्थित होते. सकाळी आंदोलकांनी राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्टेशनमध्येही प्रवेश केला. काही तर बॅरिकेड्स तोडून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनपर्यंत पाेहाचले.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी उपोषण साेडले आहे. ते म्हणाले की, सरकारसोबत चर्चा सुरू आहे. तोपर्यंत त्यांनी आंदोलकांना आंदोलन स्थगित ठेवण्यास सांगितले आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. सोनम वांगचुक यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून सांगितले, ‘संसद मार्चमध्ये जायचे आहे, मला डिस्चार्ज द्या.’
पार्लमेंट स्ट्रीटजवळ आंदोलकांशी झालेल्या संघर्षात दिल्ली पोलिसांचे एक उपनिरीक्षक जखमी झाले. जखमी उपनिरीक्षकांनी सांगितले की, ते बॅरिकेड्सजवळ तैनात असताना आंदोलकांनी दगडफेक केली, ज्यात ते जखमी झाले. तर सीजेपीच्या आंदोलकांचा आरोप आहे की, पोलीस कारवाईदरम्यान साेनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजलीजी यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे केस ओढण्यात आले. एका १२ वर्षांच्या मुलीच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले आणि इतर ४० ते ५० जण जखमी झाले.
Delhi police detain Cockroach Janata Party founder Abhijeet Dipke
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका