विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांचा विवाह निश्चित झाला आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाहसोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे. त्याआधी २९ जुलै रोजी दोघांचा साखरपुडा अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात आयोजित करण्यात आला आहे.
साखरपुडा समारंभाला पवार आणि दारा कुटुंबातील मोजके नातेवाईक, जवळचे मित्र आणि निवडक निमंत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा कार्यक्रम कोणताही मोठा राजकीय किंवा सार्वजनिक सोहळा न ठेवता खासगी स्वरूपात पार पाडण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतल्याचे समजते.
पार्थ पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली पवार कुटुंबातील तरुण चेहरा आहेत. कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर त्यांच्या नावाबाबत, जन्मस्थळाबाबत आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत विविध प्रकारची माहिती प्रसारित होत होती. यातील काही माहिती चुकीची, त्रुटीपूर्ण आणि दिशाभूल करणारी असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर गैरसमज दूर करण्यासाठी आणि वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे राहत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या नावासंदर्भात आणि मूळ गावाबाबत समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या विवाहाची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, आता साखरपुडा आणि विवाहाची तारीख अधिकृतपणे समोर आल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
MP Parth Pawar to Marry Kainaat Dara in Baramati on February 27, 2027
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!
