मदरसे बंद नाही तर कायमचे उद्धवस्त करा, टी राजा सिंह यांचे नितेश राणे यांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मंत्री नीतेश राणे यांनी मदरशांविषयी केलेल्या विधानाला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सर्वच मदरसे बंद करा. या मदरशांत देशविघातक शिक्षण दिले जाते. नीतेश राणेंना माझे निवेदन आहे की, त्यांनी हे अनधिकृत मदरसे बंद करण्याऐवजी कायमचे उद्धवस्त करावेत. हे मदरसे केवळ बंद केले, तर ते पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मदरशांवर थेट बुलडोझरच चालवा, असे आवाहन तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी केले.

आमदार टी राजा सिंह यांची शनिवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे एक सभा झाली. ते म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व अजमल कसाब सारखे अतिरेकी याच मदरशांत तयार झालेत. त्यामुळे नीतेश राणेंनी आपले बोल खरे करून दाखवावेत. खुलताबाद येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबरही उखटून टाका.



टी राजा सिंह म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटत आहे का? औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यानंतर आपल्याला मतदान मिळणार नाही अशी भीती तुम्हाला वाटते. पण ते तुम्हाला मतदान करणारच नाहीत हे लिहून घ्या. मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर हटवून तिथे शौचालय बांधावे अशी महाराष्ट्रातील हिंदूंची इच्छा आहे. महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको. त्याने आमच्या संभाजीराला हाल हाल करून ठार केले. त्यामुळे त्याची कबर हटवण्यासाठी मावळे हवे असतील, तर आम्ही लाखोंच्या संख्येने येऊ.

हिंदूनी घरोघरी 5 बंदुका ठेवण्याचेही आवाहन करताना टी राजा सिंह म्हणाले, हिंदूंनी आपल्या घरात शस्त्र ठेवले पाहिजे. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्रे ठेवणे कायदेशीर आहे. पण ते बाहेर काढून हल्ला केला तर विषय वेगळा आहे. भविष्यात युद्ध झाले आणि शस्त्र नसतील तर तुम्ही काय करणार? कसे लढणार? धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. या प्रकरणी जिथे मदत लागेल ती आम्ही करू. पण प्रत्येक घरात किमान 5 बंदुका असाव्यात. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, तर त्यांना गोळ्या घालण्यासारखी शस्त्रे आपल्याकडे असावीत.

“Dismantle Madrasas Forever, Not Temporarily: T Raja Singh’s Appeal to Nitesh Rane

महत्वाच्या बातम्या