Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा सन्मान आहे. विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

Pradhnya satav
Maharashtra Politics, महाराष्ट्र

हिंगोली मध्ये मोठी उलथापालथ: प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश मुंबईत होणार..

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

यामुळे हिंगोली जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. प्रज्ञा सातव मागील काही महिन्यापासून काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे लवकरच त्या काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार आज त्यांनी सकाळी विधिमंडळ सचिवालयाकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

Nana Patole
मुंबई

Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा सन्मान आहे. विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

Manikrao Kokate
Maharashtra Politics, महाराष्ट्र, मुंबई

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक होणार? सुनील केदार यांचा न्याय कोकाटे यांना लागू होणार?

Minister Manikrao Kokate  मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का असं प्रश्न विचारला जातोय. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळेपर्यंत कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असणार आहे.

Valmik Karad
महाराष्ट्र

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad ) याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे तो पुढील काळासाठी कोठडीतच राहणार आहे.

Porsche car
पुणे

Porsche car : पोर्श’ कार अपघात : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणातील नऊही आरोपींचे जामीन फेटाळले

अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपींकडून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याबरोबरच पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे, ही बाब विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी निदर्शनास आणून दिल्याने विशाल अगरवाल त्याच्यासह ९ आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

Bangladesh Liberation
देश-विदेश

Bangladesh Liberation : बांगला देश मुक्ती संग्रामात रॉची भूमिका , भारताचा निर्णायक विजय घडवणारे ‘धुरंधर’

भारत आणि बांगला देश १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा करतात. १९७१ मधील या युद्धात पाकिस्तानला ऐतिहासिक पराभव झाला आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयास आला. भारतीय सैन्याचे शौर्य सर्वश्रुत आहे, परंतु या विजयामागे काही अदृश्य हातही सतत काम करत होते. ते म्हणजे रॉचे गुप्तहेर. त्यांनी युद्धाच्या महिन्यांपूर्वीच पाकिस्तानचा कणा मोडणारी गुप्त तयारी केली होती.

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray : आम्ही दाखवले, भाजपच्या नेत्यांनीही हिंमत दाखवून केलेल्या कामांचे सादरीकरण करावे, आदित्य ठाकरे यांचे आव्हान

आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे, आता भाजपच्या नेत्यांनीही हिंमत दाखवून त्यांनी केलेल्या कामांचे असेच सादरीकरण करावे, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

Bandu Andekar
पुणे

Bandu Andekar : बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा, २२ लाखांची रोकड व शस्त्र जप्त

गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करत २२ लाख रुपयांची रोकड आणि एक बंदूक जप्त केली आहे. आंदेकर कुटुंब पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Manikrao Kokote
महाराष्ट्र

Manikrao Kokote : माणिकराव काेकाेटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार, सदनिका घाेटाळ्यात दाेन वर्षांची शिक्षा कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्यात ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या मंत्र्यांचे मंत्रिपद जाते. त्यामुळे काेकाटेंच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे.

Raj-Uddhav
मुंबई

Raj-Uddhav : राज – उध्दव युतीची बातमी लवकरच, मनसे- शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची पुढील 1-2 दिवसांत बातमी देऊ, असा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर ते बाेलत हाेते.

महाराष्ट्र

Shinde Camp : शिंदे गटाचा व्यंगचित्रप्रहार, उबाठावर तुफान टीका ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राद्वारे जोरदार प्रहार केला आहे.