Porsche car : पोर्श’ कार अपघात : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणातील नऊही आरोपींचे जामीन फेटाळले

विशेष प्रतिनिधी

पुणे : Porsche car अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपींकडून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याबरोबरच पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे, ही बाब विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी निदर्शनास आणून दिल्याने विशाल अगरवाल त्याच्यासह ९ आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.Porsche car

कल्याणीनगर भागात ‘पोर्श’ कार भरधाव वेगाने चालवून अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना उडविले. . या प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि रक्ताचे नमुने बदलणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. यात मुलाचे आई वडील विशाल व शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग, अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल , अतुल घटकांबळे, ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.Porsche car



या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला महिला असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयाने आधीच अंतरिम जामीन दिला आहे. दरम्यान, विशाल अगरवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे विशाल अगरवाल याच्यासह उर्वरित नऊ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, शिशिर हिरे व शुभम जोशी यांनी उच्च न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली. रक्ताचे नमुने बदलून आरोपीनी गंभीर गुन्हा केला आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते पुराव्यात छेडछाड करू शकतात. असे शिशिर हिरे यांनी न्यायालयाच्या पटवून दिले.

Porsche car accident: Bail denied to all nine accused in blood sample tampering case

महत्वाच्या बातम्या