Chief Minister : जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत, मुख्यमंत्र्यांचे संकेत
महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते हा प्रश्न समंजसपणे हाताळत असून, पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय अंतिम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.











