Girish Mahajan त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का, शिर्डीत विखे पाटलांची सत्ता
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसला असून भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार-सोनवणे विजयी झाल्या असून, भाजपचे कैलास घुले यांचा १८०० मतांनी दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ, भाजपचे सात आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत .











