PM Modi : घनदाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही; पंतप्रधान मोदींनी फोनवरूनच घेतली बंगालमध्ये सभा

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: PM Modi पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील तहेरपूर येथील नेताजी पार्कमध्ये शनिवारी आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. घनदाट धुक्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला तहेरपूर हेलिपॅडवर उतरणे शक्य न झाल्याने ते कोलकाता विमानतळाकडे परतले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी दूरध्वनीद्वारे सभेला संबोधित केले.PM Modi

पंतप्रधान मोदी म्हणाले, “खराब हवामानामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र माझे मन आणि शब्द तुमच्यासोबतच आहेत.”PM Modi

आगामी २०२६ विधानसभा निवडणुकांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. बंगालमध्ये ‘महाजंगलराज’ सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका केली.PM Modi



“भाजपशासित त्रिपुरा वेगाने प्रगती करत आहे, तर टीएमसीच्या राजवटीत बंगाल विकासात मागे पडत आहे,” असे सांगत मोदींनी भाजप सरकार आल्यावर त्रिपुरात बदल कसा झाला, याचे उदाहरण दिले.

पंतप्रधान मोदींनी बंगालच्या जनतेला आगामी निवडणुकांत भाजपला संधी देण्याचे आवाहन केले. “राज्यात खऱ्या अर्थाने विकास हवा असेल, तर केंद्र आणि राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन सरकार’ आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

एसआयआर (SIR) प्रक्रियेच्या विरोधावर बोलताना मोदींनी आरोप केला की, घुसखोरी उघड होईल या भीतीने टीएमसी या प्रक्रियेचा विरोध करत आहे.

ग्रामीण भागातील वातावरणाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “बंगालच्या गल्ल्या-बोळांत ‘बांचते चाई, बीजेपी ताई’ हा नारा घुमत आहे. टीएमसी कितीही विरोध करो, पण जनतेला वेठीस धरून विकास रोखता येणार नाही.”

सभेदरम्यान पंतप्रधान मोदींनी ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा उल्लेख ‘रिषी बंकिम बाबू’ असा करत, ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा देश साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Dense Fog Grounds Chopper; PM Modi Addresses Bengal Rally Over Phone

महत्वाच्या बातम्या