Aditya Thackeray : खुर्चीची आणि सत्तेची चिंता असती, तर भाजपसोबत गेलो असतो, आदित्य ठाकरे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे: Aditya Thackeray आम्हाला जर फक्त खुर्चीची आणि सत्तेची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो. पण आमचे राजकारण मूल्यांवर आधारित आहे, सत्ताकेंद्रित नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.Aditya Thackeray

भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “देशातील एक तरी असे शहर दाखवा जे भाजपशासित आहे आणि जिथे खरोखर सुधारणा झाली आहे. ज्या शहरांत किंवा राज्यांत भाजप सत्तेत आली, तिथे प्रगतीऐवजी उलट दिशेने प्रवास सुरू झाला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याऐवजी दुसऱ्यांनी केलेल्या कामांची नावे बदलणे किंवा समाजात फूट पाडणे, हीच यांची राजकीय पॉलिसी आहे.”Aditya Thackeray



आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई-पुणे हे अंतर आज मला कधीच नव्हते इतके मोठे वाटले. हिंजवडीसारख्या भागात २५ मिनिटांच्या अंतरासाठी आज २ तास लागतात. याचा थेट परिणाम गुंतवणूक आणि रोजगारावर होत आहे. पुणे शहर पूर्वी इतक्या सहज पाण्यात बुडायचं नाही, पण आता परिस्थिती गंभीर झाली आहे. ही केवळ लोकसंख्येमुळे झालेली कोंडी नसून प्रशासकीय अपयश आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणालेत.

रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली नदीचे पात्र अरुंद केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “नदी पात्र खोल करण्याऐवजी ते अरुंद करणे हे जगातले एकमेव उदाहरण पुण्यात पाहायला मिळतेय. यामुळे ११ मंदिरे आणि ४ रस्ते पाण्याखाली जातील. वेताळ टेकडीवरील प्रस्तावित रस्ता आणि बोगदा हा ‘विकास’ नसून ‘विनाश’ असून आपण मंत्री असताना याला स्थगिती दिली होती.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “पुण्यात टोळ्यांचे युद्ध आणि ड्रग्जचा वाढता प्रश्न ही धोक्याची घंटा आहे. राज्यात खरंच गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न पडतोय. भ्रष्टाचाराच्या किंवा तुरुंगाच्या भीतीने लोक भाजपकडे जात आहेत, पण जे प्रामाणिकपणे काम करू इच्छितात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

If Power Was My Aim, I’d Have Joined the BJP,” Aditya Thackeray Claims

महत्वाच्या बातम्या