Chief Minister : जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत, मुख्यमंत्र्यांचे संकेत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते हा प्रश्न समंजसपणे हाताळत असून, पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय अंतिम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.Chief Minister

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) ९० ते १०० जागांवर निवडणूक लढवण्यावर आग्रही असली, तरी भाजपकडून सेनेला ५० ते ६० जागांवरच समाधान मानावे लागेल, असे संकेत भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.Chief Minister



विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नसल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हेच मुख्य भागीदार असतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजपने ‘मिशन मुंबई’साठी २० सदस्यीय निवडणूक समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत केंद्र व राज्य पातळीवरील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. उमेदवार निवड, निवडणूक रणनीती ठरवणे आणि प्रत्यक्ष समन्वय साधणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असेल.

या समितीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, पराग अळवणी, योगेश सागर, मिहिर कोटेचा, प्रसाद लाड, मनीषा चौधरी, चित्रा वाघ यांच्यासह मुंबई भाजपचे महामंत्री राजेश शिरवडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर आणि माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर सोपवण्यात आल्याने भाजपने उघड नाराजी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांच्या जागी नवा चेहरा दिला, तर त्याचे स्वागत केले जाईल, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे रिंगणात उतरणार, हे जवळपास निश्चित झाले असून, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Decision on seat allocation in two days, Chief Minister hints

महत्वाच्या बातम्या