ई-केवायसीअभावी २६ लाख ‘लाडकी बहीण’ अपात्र? पडताळणी अंतिम टप्प्यात, एप्रिल अखेर चित्र स्पष्ट होणार
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाखो महिलांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाखो महिलांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभझाला. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS), ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी यासर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले .
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान असून स्वप्नातही त्यांचा अवमान मी करू शकत नाही. संत, महापुरुषांविषयीची ते कसे समर्पित होते. त्यांची आदर भावना कशी होती, हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. यात कुठेही अवमान नव्हता. मात्र जाणीवपूर्वक आपल्या वक्तव्याचा अनर्थ केला गेला. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, अशा शब्दांत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी माफी मागितली
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विधानपरिषदेच्या १० जागांसाठी विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.महत्वाच म्हणजे भाजपाला पाच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पक्षात चर्चांना उधाण आले आहे.प्रादेशिक संतुलन साधत संघटन बळकटीसाठी भारतीय जनता पक्षच्या ५ संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली आहेत.
शहरातील वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार अजित पवार गटाचे नेते सुनील टिंगरे यांचे राजकीय पुनर्वसन होणार अशा चर्चा संध्या शहरात रंगल्या आहेत.आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांचे आक्षेपार्ह मोर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करणे आणि नक्षलवादी कमांडरचे उदात्तीकरण केल्याप्रकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
साधू संत, बागेश्वर बाबा यांचे हिंदूत्व नाही असे मुक्ताफळे संजय राऊत उधळत आहेत. राऊतांच्या हिंदूत्वाची व्याख्या काय आहे? याकूब मेमन कबर सुशोभीकरण, नमाज पठण स्पर्धा, जनाब बाळासाहेब ठाकरे उल्लेख करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? तुम्ही साधू संताचा अपमान करत आहात, जनता तुम्हाला माफ करणार नाही. राऊत मतांसाठी दाढ्या कुरवाळत बसलेत. असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.अनधिकृत होर्डिंग्ज ओळखण्यासाठी आता होर्डिंगला क्यूआर कोड लावला जाणार आहे.
पुण्यातील नामांकित आयएलएस लॉ कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि अरुणावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून, भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोधी इस्टेटमधील नव्या अधिकृत निवासस्थानी राहायला गेल्यानंतर अवघ्या एका दिवसात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि नुकतेच आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले खासदार राघव चढ्ढा यांनी केजरीवाल यांच्यावर “शीश महल पार्ट २” उभारल्याचा आरोप केला आहे.