Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Vijay Wadettiwar : नागपूर स्फोट प्रकरणी दोषींना भरचौकात फाशी द्या, विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत मागणी

नागपूरमधील एका कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या प्रकरणातील दोषींवर खुनाचा (कलम 302गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दोषींना भरचौकात फाशी द्या, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Yogesh Mhase
मुंबई

Yogesh Mhase : राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदलीः नागपूरचे डॉ. अभिजीत चौधरी पुण्यात ; योगेश म्हसे मंत्रालयात सचिव

नागपूरच्या आयुक्त पदावरून डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांना आता पुणे महानगर विकास प्राधिकारणावर पाठवण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाचे आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करत त्यांना मंत्रालयातील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Uday Samant
मुंबई

Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

दावोस येथे २०२२ ते २०२५ दरम्यान झालेल्या गुंतवणूक करारांबाबतची सविस्तर माहिती देणारी ‘भगवी पत्रिका’ लवकरच विधान परिषदेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या पत्रिकेत करारांची अंमलबजावणी, प्रत्यक्षात सुरू झालेले प्रकल्प, प्रक्रियेत असलेले प्रकल्प तसेच प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा तपशील दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mundhe
मुंबई

Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून शासकीय सेवेत शिरकाव करणाऱ्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Yogesh Kadam
मुंबई

Yogesh Kadam : बदलापूर बीजांड विक्री प्रकरणी कठोर कारवाई, गृह राज्य मंत्री योगेश कदम यांची माहिती

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील बीजांडांची बेकायदेशीररीत्या काढणी व विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी दिले.

Raju Shetti
महाराष्ट्र

Raju Shetti : आंबा व काजू उत्पादकांना मदत द्या अन्यथा धडक मोर्चा, राजू शेट्टी यांचा इशारा

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने या शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती व हेक्टरी ५ लाख रूपये मदतीचा हात उद्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर न केल्यास १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मा. खासदार राजू शेट्टी यांनी वेंगुर्ला येथे झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केली.

Latest

Shri Rasiklal Dhariwal : श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Shri Rasiklal Dhariwal आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा जपत श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त ९वे वार्षिक रक्तदान शिबिर यंदा उत्साहपूर्ण वातावरणात आणि अभूतपूर्व प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडले.

पुणे

Brought back citizens : दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

Brought back citizens मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

पुणे

Bullet Riders : पुणे पोलिसांचा बुलेटस्वारांना मोठा दणका! २८२२ बुलेटवर कारवाई; ८७० सायलेन्सर्सवर फिरवला बुलडोझर!

शहरात कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. गेल्या ३० दिवसांपासून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल २ हजार ८२२ बुलेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या ८७० बेकायदेशीर सायलेन्सर्सवर आज प्रत्यक्ष बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले.

पुणे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मदतीने पुणेकर पर्यटक मायदेशी परतले! एकनाथ शिंदेचे मानले आभार…

इस्त्रायल–अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आखाती देशांमधील दैनंदिन जीवनावर तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासावरही झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली, तर काही विमान कंपन्यांनी मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले. या पार्श्वभूमीवर पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय नागरिक परदेशातच अडकले होते. त्यामध्ये दुबईत गेलेले काही पुणेकर पर्यटकांचाही समावेश होता. अखेर हे सर्व पर्यटक सुखरूपपणे पुण्यात परतले असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई

Vidhan Bhavan : विधानभवनाच्या लाॅबीत ‘बाप’ काढल्यावरून राडा, आमदार भास्कर जाधव – सचिन कल्याणशेट्टी भिडले

विधानभवनाच्या लाॅबीत ‘बाप’ काढल्याच्या आराेपावरून चांगलाच राडा झाला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी एकमेंकांशी भिडले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास तीन दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरुवात झाली. यावेळी विधान भवनाच्या लॉबीत भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात भास्कर जाधव संतापलेल्या अवस्थेत दिसतात तर तुम्ही आमचा बाप काढू नका असं सचिन कल्याणशेट्टी त्यांना उत्तर देताना दिसतात.

मुंबई

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला, ठाकरे गटाशी चर्चेनंतर जयंत पाटील यांची कबुली

Jayant Patil राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणासंदर्भात शरद पवार गटाच्या चर्चेला अजित पवार गटाच्या नेत्यांनी भीक घातली नाही. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाशी संबंध ताणले गेले. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे राज्यसभेवरील जाणेच अवघड झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला असल्याची कबुली शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.