Sunil Tatkare : राष्ट्रवादी अजित पवार गटात वादाची ठिणगी, सुनील तटकरे यांनी तडकाफडकी मंजूर केले तिघांचे राजीनामे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षपातळीवर वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार हयात असताना पक्षाच्या तीन प्रमुख विभागांच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले राजीनामे प्रलंबित ठेवण्यात आले होते. हे राजीनामे आता पक्षाकडून तातडीने मंजूर करण्यात आले आहेत. या राजीनाम्यांमागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी असल्याची चर्चा आहे.











