Amol Mitkari : व्हिएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांना अटक करा अन्यथा लढा, अमोल मिटकरी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Amol Mitkari  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमान कंपनीचा मालक विमानात झोपला होता असा व्हिडिओ समोर आला आहे. करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस लढा उभारेल असा इशारा दिला आहे.Amol Mitkari

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. VSR चा मालक रोहित सिंहला अटक करा अशी मागणी मिटकरींनी केली आहे.Amol Mitkari



राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काल ‘व्हीएसआर व्हेंचर्स’चे मालक रोहित सिंग यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ ‘ट्वीट’ केला होता. त्यामध्ये रोहित सिंग हा वैमानिकाच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. असाच बेजबाबदारपणा अजितदादांच्या विमाना अपघातावेळी झाला होता का? असा सवाल जय पवारांनी केला आहे. जय पवारांच्या या शंकेचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही समर्थन केलं आहे. यासंदर्भात सरकारने ‘व्हीएसआर व्हेंचर’चा मालक रोहित सिंगला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच अधिक चौकशीसाठी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनाही सरकारने ताब्यात घ्यावं, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संपूर्ण लढ्यात राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जय पवार यांच्या सोबत असल्याचच आमदार मिटकरी म्हणाले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारने रोहित सिंगला अटक न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लढा उभारतील, असेही आमदार अमोल मिटकरी म्हणालेत.

Arrest VSR Owner Rohit Singh or Face Protest, Warns Amol Mitkari

महत्वाच्या बातम्या