Sunil Tatkare : राष्ट्रवादी अजित पवार गटात वादाची ठिणगी, सुनील तटकरे यांनी तडकाफडकी मंजूर केले तिघांचे राजीनामे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षपातळीवर वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार हयात असताना पक्षाच्या तीन प्रमुख विभागांच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले राजीनामे प्रलंबित ठेवण्यात आले होते. हे राजीनामे आता पक्षाकडून तातडीने मंजूर करण्यात आले आहेत. या राजीनाम्यांमागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी असल्याची चर्चा आहे.

प्रजासत्ताक दिनी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री म्हणून अजित पवार पक्ष कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. याच दरम्यान, पक्षाच्या तीन सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी एकत्रितपणे त्यांचे राजीनामे अजित पवारांकडे सुपूर्द केले होते. मात्र, अजित पवारांनी हे राजीनामे नाकारले. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता हे राजीनामे प्रदेश कार्यालयामार्फत स्वीकारण्यात आले आहेत. Sunil Tatkare



असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी
मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांचा यामध्ये समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले हाेते. लोकशाहीवादी पक्षात संघटनात्मक पातळीवर असमानता आणि न्यायालयीन तत्त्वांचा अभाव जाणवत आहे. Sunil Tatkare

वरिष्ठ पातळीवरून मिळणाऱ्या असहकार्यामुळे संघटना वाढवणे कठीण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पदावर राहणे अशक्य झाल्याने भविष्यातील हानी टाळण्यासाठी आम्ही पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे म्हटले हाेते. या तिन्ही नेत्यांची थेट नाराजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हाेती. Sunil Tatkare

मात्र, आता अजित पवारच राहिले नसल्याने सुनील तटकरे यांनी तिघांचेही राजीनामे मंजूर करून टाकले आहेत. नाराजी असेल तर कारण विचारून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा हाेता, अशी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

A dispute sparks in the Ajit Pawar faction of the Nationalist Congress Party, Sunil Tatkare hastily accepts the resignations of three