Manoj Jarange : मनाेज जरांगे म्हणतात.. कधी कोणी येऊन मला मारून टाकेल, याची कल्पनाही नाही

विशेष प्रतिनिधी

बीड : Manoj Jarange समाजासाठी लढतो म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत आहेत. माझे कुटुंबही यात डावावर लागले आहे. कधी कोणी येऊन मला मारून टाकेल, याची कल्पनाही नाही. पण मी समाजासाठी उतरलो आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि मी मरणाला भीत नाही, असे मराठा आंदोलक मनाेज जरांगे यांनी सांगितले.Manoj Jarange

मनाेज जरांगे समाजातील तरुणांना आवाहन करताना म्हणाले, कायम टिकेल असे काहीतरी मागा. लाडकी बहिणीला दिलेले पंधराशे रुपये पुरतात का? बाजारात जाईपर्यंत उडून जातात. हीच किंमत आपल्या लेकरा बाळांची केली आहे का? मी जातपात पाहत नाही, तसे असते तर महादेव मुंडेच्या कुटुंबासाठी मी लढलो नसतो. माझ्यामुळे दाबलेली केस उघडी झाली आणि आता आरोपींना जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली.Manoj Jarange



 

लाथ मारेन तिथून पाणी काढून दाखवेन. त्यामुळे शेतकऱ्यांना आता माझ्यासोबत हाक दिली की, एकत्र यावे. मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही. कसे हमीभाव मिळत नाहीत. कशी पिक विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाहीत. फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईन. आपल्यावर सातत्याने काही दुकानदार माध्यमातून गबाळ उचलण्याची टीका करतात. मात्र या सर्व गाड्या समाजाच्या आहेत. मला जर यांनी गाडीतून खाली उतरवले तर माझ्याकडे रिक्षालाही पैसे नाहीत.

आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करावर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार आहोत. समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास पंधरा मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. वर्षभर हेच काम पूर्ण करणार आहे. त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा. मला माझे काम करू द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Manoj Jarange says.. I have no idea when someone will come and kill me.

महत्वाच्या बातम्या