पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही आमदारांविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी करत पुणे शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत दोन्ही आमदारांनी स्वतंत्र सार्वजनिक भाषणांमध्ये मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण आणि भडकाऊ भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
ही तक्रार पुणे शहराचे पोलिस उपायुक्त (DCP) यांच्याकडे देण्यात आली असून त्याच्या प्रती पुणे पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. संबंधित आमदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
तक्रारदारांच्या लेखी निवेदनानुसार, दोन्ही आमदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वक्तव्यांमुळे समाजात धार्मिक द्वेष पसरू शकतो आणि सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
तक्रारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
तक्रारदारांच्या मते, या भाषणात वापरलेली भाषा मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात संताप निर्माण होऊन सांप्रदायिक तणाव वाढण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
तक्रारीत भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा उल्लेख करत लांडगे यांनी भाषणादरम्यान मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
तक्रारीनुसार, लांडगे यांनी मुस्लिम समाजाची मतं नकोत असे म्हणत त्या समाजावर आई-बहिणींवर वाईट नजर ठेवतात असा आरोप केल्याचे सांगितले गेले आहे. तक्रारदारांच्या मते, ही विधाने अत्यंत अपमानास्पद असून समाजात द्वेष पसरवू शकतात.Mahesh Landge and Sangram Jagtap
या प्रकरणात तक्रारदारांनी इंस्टाग्राम रील्सचे दुवे डिजिटल पुरावा म्हणून पोलिसांना सादर केले आहेत. संबंधित व्हिडिओंची चौकशी करून आवश्यक ती फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
सामाजिक कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी ही तक्रार काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधीमंडळाने दिली असून त्यामध्ये अॅड. अबुल सोनवणे, मुनावर कुरेशी, अहमद सय्यद यांच्यासह इतरांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक मंचावर बोलताना जबाबदारीने वागणे आवश्यक असून धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने टाळली पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे.Mahesh Landge and Sangram Jagtap
तक्रारदारांनी पोलिसांना खालील भारतीय न्याय संहिता (BNS) कलमांखाली गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे:
- कलम 196 (a) – धर्माच्या आधारावर समाजात वैमनस्य निर्माण करणे
- कलम 299 – धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणे
- कलम 353 (a) – समाजात द्वेष किंवा असंतोष निर्माण करणारी विधाने
- कलम 352 – शांततेचा भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेला अपमान तपास सुरू
पुणे पोलिसांनी या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून सध्या प्राथमिक पडताळणी सुरू असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओंची सत्यता तपासल्यानंतरच एफआयआर दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.Mahesh Landge and Sangram Jagtap
Row Erupts Over Remarks by MLAs Mahesh Landge and Sangram Jagtap; Demand to File FIR
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई