Sanjay Shirsat : आमच्या नादाला लागले तर.. संजय शिरसाट यांचा भाजपचे मंत्री गणेश नाईक यांना इशारा

विशेष प्रतिनिधी

संभाजीनगर : Sanjay Shirsat “बेछूट आरोप करणे गणेश नाईकांनी थांबवावे. तुमच्याबद्दल असलेली माहिती समोर येईल. मग गणेश नाईकांना बिबट्यापासून दूर पळावे लागेल,” असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे मंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.Sanjay Shirsat

शिरसाट म्हणाले, “गणेश नाईक जाणूनबुजून टीआरपी वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. महाराष्ट्रात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, त्यावर गणेश नाईक चकार शब्द काढत नाहीत. वन विभागाचे खाते गणेश नाईकांना सांभाळता आले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंसारख्या वाघांना गणेश नाईकांकडून टार्गेट करण्यात येत आहे.”Sanjay Shirsat



“गणेश नाईकांनी केलेले घोटाळे भाजपमधील लोकच बाहेर आणत आहेत. यातून वाचण्यासाठी गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. पण, हे आरोप करणे नाईकांनी थांबवावे. आमच्या नादाला लागले तर तुमच्याबद्दल असलेली माहिती ही नक्की समोर येईल. मग गणेश नाईकांना बिबट्यापासून दूर पळावे लागेल,” असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.

श्रीकांत शिंदेंनी म्हटलं, “वनखात्यांच्या कारभाराबाबत अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. वन खात्याकडे पैशाची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाड तोडून त्यातून पैसे कमावणार आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्यांना जंगलातच रोखण्यासाठी जंगलात शेळ्या बकऱ्या सोडण्यात येतील असे काही जणांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता तेच म्हणत आहे की जंगलात फळझाड लावू आणि बिबट्यांना रोखू. पहिले हे नक्की करा की बिबटे हे शाकाहारी आहेत की मांसाहारी. त्यामुळे आधी जंगलातील बिबटे सांभाळा मग शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागा.”

‘Don’t Mess With Us’: Sanjay Shirsat Warns BJP Minister Ganesh Naik

महत्वाच्या बातम्या