विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या या सत्तेला खिंडार पडल्याचे दिसत आहे. सहा एक्झिट पोलपैकी केवळ एका एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालमधील सत्ता कायम राहात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अन्य एक्झिट पोलने भाजपला बहुमत मिळत असल्याचे दाखवत आहे.Mamata Banerjee
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर थेट मतदारांपर्यंत पोहोचत ममता बॅनर्जींना उखडून फेकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. याचेच परिणाम आता एक्झिट पोलमधून सुद्धा पाहायला मिळत आहेत.Mamata Banerjee
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा असून या राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपला किंवा तृणमूल काँग्रेसला बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे. मैट्रिज आणि पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 आणि भाजपला 146 ते 161 जागा मिळू शकतात. तर अपक्ष व इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळू शकतात, असे सांगण्यात आले आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत प्रसिद्ध असलेल्या चाणक्यनुसार, तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 आणि भाजपला 150 ते 160 जागा मिळू शकतात. तर अपक्ष व इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळू शकतात.
प्रजा पोलच्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 85 ते 110 आणि भाजपला 178 ते 208 जागा मिळू शकतात. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळत आहे. या संस्थेच्या पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 177 ते 187 आणि भाजपला 95 ते 110 जागा मिळू शकतात. तर अपक्ष व इतर पक्षांना 1 ते 4 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, पीमारक्यू एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 118 ते 138 आणि भाजपला 150 ते 175 जागा मिळू शकतात. तर अपक्ष व इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळू शकतात.
Mamata Banerjee’s hold shaken in West Bengal, BJP tipped to win in five of six exit polls
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन