विशेष प्रतिनिधी
मुंबई : समाजवादी पक्षाचे मानखुर्द – शिवाजी नगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाशी संबंधित केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. विधान सभेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजप आमदार आणि उच्च – तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे निलंबन अधिवेशनापुरते असेल की पुढेही वाढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती देखील नेमण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे विधान केले आहे. आझमी यांच्या वक्तव्यावर संतापून आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता. विधान परिषदेत भाजपा गटनेते प्रवीण दरेकर आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही. देशाभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का? राष्ट्रभक्त मुसलमानांसोबत वाद आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा वध करणं, हलाल करून त्यांची चामडी सोलणं आणि त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगला माणूस म्हणणं, चांगला प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले होते.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंग सोलले, त्यावर मीठ टाकले. चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा आणि आपल्या देशभक्तीचा अपमान आहे, असे ते म्हणाले होते.
A lesson to Abu Azmi, suspended from the Legislative Assembly for his remarks on Aurangzeb
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल