विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे, असा दावा मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचे ‘सीआयडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हा आपला निकटवर्तीय असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी एक पोस्ट केली आहे.
करूणा मुंडे शर्मा म्हणाल्या, “दोन दिवसांपूर्वी अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला आहे, अशी माहिती मिळाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कुणी दोषी असेल, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,’ असं धनंजय मुंडे म्हणत होते. आता ही मागणी पूर्ण करावी. मी राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ देऊ नये, अशी मागणी केली होती.
पण, आता धनंजय मुंडेंचा 100 टक्के राजीनामा होणार आहे. जरी राजीनामा झाला नाही, तर मी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मी तीन वर्षापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
अधिवेशनाआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेला नाही, तर मी माझी भूमिका स्पष्ट करेल, असा इशारा देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे. राजीनामा दिला नाही, तर बडतर्फ केले पाहिजे. खंडणी आणि हत्येचा गुन्हा वेगवेगळा नोंदवला गेला. हे सगळे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी केलेला प्रयत्न होता. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी होण्यासाठी मुंडेंचा राजीनामा होणे गरजेचे आहे.
Ajit Pawar has accepted Dhananjay Munde’s resignation, Karuna Munde Sharma claims
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…