Anna Hazare : जागतिक शांततेसाठी भारताने भूमिका घ्यावी; अण्णा हजारे यांचे मोदींना पत्र

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तीव्र लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मानवतेसमोर मोठा धोका उभा राहिल्याचे अण्णांनी पत्रात नमूद केले आहे. Anna Hazare

मध्यपूर्वेत गेल्या आठवड्यापासून तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. आठवडाभर उलटल्यानंतरही हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Anna Hazare



या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सध्याच्या जागतिक परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पत्रात ते म्हणाले की, जग सध्या अत्यंत चिंताजनक अवस्थेतून जात आहे. विविध देशांतील संघर्षामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित झाले आहे. युद्धामुळे निष्पाप महिला, मुले आणि कुटुंबांना मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत, जे अत्यंत वेदनादायक आहे. Anna Hazare

भारताची परंपरा ही अहिंसा आणि शांततेची राहिली असून भारताने नेहमीच जगाला संवाद आणि समन्वयाचा मार्ग दाखवला आहे, असेही त्यांनी नमूद केले. या कठीण काळात भारताने शांततेचा संदेश देत संवादासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे अण्णांनी पत्रात स्पष्ट केले आहे. Anna Hazare

युद्धामुळे केवळ विनाश आणि मानवी हानी होते, मात्र संवादातूनच दीर्घकालीन शांतता आणि स्थिरतेचा मार्ग मिळू शकतो, असे सांगत भारताने एक जबाबदार लोकशाही राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. Anna Hazare

पत्राच्या शेवटी अण्णा हजारे यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत भारताने मानवता आणि शांततेच्या बाजूने ठाम भूमिका घेतली, तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल.

Anna Hazare Appeals to PM Modi to Lead Global Peace Efforts Over Iran Conflict

महत्वाच्या बातम्या