विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाच विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे विधान भवनात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सर्व कर्मचारी प्रवेशद्वारावर एकत्र जमा झाले. पोलिसांच्या वतीने आता विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
विधान भवनाची सुरक्षा यंत्रणा या धमकीमुळे सतर्क झाली आहे. पोलिसांच्या वतीने विधान भवनात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या संदर्भात धमकीचा मेल प्रशासनाला प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सर्व मंत्री आणि आमदार विधान भवन परिसरात असतानाच अशा प्रकारे धमकी मिळाल्याने याबाबत अधिक सतर्कता पाळली जात आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना विधान भवनाच्या बाहेर काढून पूर्ण विधान भवन परिसराची कसून तपासणी सुरू आहे.
सध्या मुंबई पोलिसांचे विशेष पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) यांची सध्या विधानभवन परिसराची कसून तपासणी सुरु आहे.
Bomb Threat to Maharashtra Vidhan Bhavan Sparks Security Alert
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा