Girish Mahajan : अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण करू नका; रोहित पवारांना गिरीश महाजन यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Girish Mahajan दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राजकीय फायदा मिळवण्यासाठी कोणीही अशा प्रकारची व्हल्गर विधाने करू नये असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना सुनावले आहे.Girish Mahajan

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांचा असा अचानक अंत होईल याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र या अपघातानंतर हा अपघात होता की घातपात, याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.Girish Mahajan



या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत तीन ते चार पत्रकार परिषदा घेत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी हा अपघात घातपात असू शकतो, असा आरोप करत काही मुद्दे मांडले. विशेषत: DGCA चा अहवाल, VSR कंपनीला मिळत असलेले संरक्षण, तसेच त्या कंपनीच्या मालकाला सीआयडी चौकशीदरम्यान मिळालेली कथित व्हीआयपी वागणूक यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांना न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रोहित पवार यांच्या या आरोपांवर आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या निधनाचे राजकारण करून काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

गिरीश महाजन म्हणाले, “अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे राजकारण कुणीही करू नये. सध्या या घटनेबाबत अनेक प्रकारचे तर्क लावले जात आहेत. कुणी बॉम्ब ठेवला होता असे म्हणत आहे, तर कुणी सुसाईड बॉम्बर असल्याचे बोलत आहे. अशा प्रकारचे आधारहीन दावे करणे योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, ही सर्वांचीच भावना आहे आणि मुख्यमंत्रीही त्याबाबत गंभीर आहेत. त्यामुळे केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी कोणीही अशा प्रकारची व्हल्गर विधाने करू नयेत.”

दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या पत्रकार परिषदेत ते नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी सांगितले की, या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार तसेच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कोणाला काही शंका किंवा मागणी असल्यास त्यांनी दिल्लीला जाऊन संबंधित यंत्रणांकडे अपील करावे किंवा अर्ज सादर करावा.
“या संपूर्ण चौकशी प्रक्रियेत शंभर टक्के पारदर्शकता आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत संभ्रम निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नाही,” असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

Don’t Politicize Ajit Pawar’s Death: Girish Mahajan Slams Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या