विशेष प्रतिनिधी
मुंबई : जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर धनंजय मुंडे यांचा ते आता राजीनामा घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी म्हटले आहे.
भीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. आरोपींनी देशमुखांना जबरदस्त मारहाण केली आहे. यावर आव्हाड म्हणाले, गेले ८० दिवस आम्ही हेच तर सांगत होतो. संतोष देशमुख यांच्या फोटोचे वर्णन माझ्या भाषणात मी केलेले आहे. तेव्हा माझी टिंगल टवाळी करीत होते. हे हरामी, नालायक, जल्लाद संतोष देशमुख यांच्यावर लघुशंका करीत होते हे पाहून तुमचे हृदय कुठे हरवले होते. त्यांनी केलेल्या कृतीला राजाश्रय आहे. त्यामुळे हे घडले आहे. हे फोटो त्यांची मुलं बघतील तेव्हा त्यांच्या मनाचं काय होईल?
वाल्मीक कराड विरोधात कोणी बोलायला तयार नाही. कारण हा बाहेर आल्यावर आपल्याला मारेल अशी दहशत समाजात आहे अशी खंत व्यक्त करून जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मीक कराड याच्या कोठडीत जाऊन त्यांची मालिश करतात काय ? एखाद्या जखमी माणसावर हे लघुशंका करतात. म्हणजे यांना लाज नाही वाटत? धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सरकार घेणार नाही, म्हणून मी त्यांचा राजीनामा मागत पण नाही. पण, महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही. या सगळ्याचा सूत्रधार एकच वाल्मीक कराड आहे आणि त्याचा बाप धनंजय मुंडे आहे. आमच्या बाकी कोणाकडून अपेक्षा नाहीत, मात्र मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती. मी तर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलीची शपथ दिली होती असेही आव्हाड यावेळी म्हणाले. Jitendra Awhad
आव्हाड म्हणाले, वाल्मीक कराड भलेही माझ्या जातीचा. मात्र मला विचारलं तर मी आजही म्हणेन की त्याला भर रस्त्यात फाशी द्या. पण, खुलेआम सांगतो, कोणाचा तरी गेम होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर आता ११ वाजता फ्लॅश येईल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा..आम्ही रोज हा मुद्दा मांडणार आहोत. या आधी २-३ वर्षापूर्वी पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. वाल्मीक सांगेल तेच ते करायचे. Jitendra Awhad
Jitendra Awhad expressed hope that Dhananjay Munde will resign now if the Chief Minister decides
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल