Manoj Jarange : महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक नावे समोर येणार, मनोज जरांगे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात अशी काही धक्कादायक नावे पुढे येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.Manoj Jarange

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले गेले; मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा ठाम आरोप केला होता.
या हत्येच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. तपासादरम्यान संशयितांची नार्को चाचणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही तांत्रिक चाचण्यांचे अहवाल अधिकृतपणे विशेष तपास पथकाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे समजते. या अहवालांमधून अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत.Manoj Jarange



मनोज जरांगे पाटील बीड येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महादेव मुंडे हत्या प्रकरणात अशी काही धक्कादायक नावे पुढे येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल. तपास अंतिम टप्प्यात असून अहवाल न्यायालयासमोर सादर झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.Manoj Jarange

जरांगे म्हणाले, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात मांडला जाईल आणि त्यानंतर पोलिस काही नावे जाहीर करतील. मलाही काही नावे माहिती आहेत; परंतु तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मी ती नावे सध्या सांगणार नाही. मोठी आणि प्रभावशाली नावे समोर येण्याची शक्यता आहे.Manoj Jarange

महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीपासूनच या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा होती. कुटुंबीयांनी सातत्याने निष्पक्ष तपासाची मागणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने विशेष तपास पथक स्थापन केले होते. आता नार्को आणि मेंदू नकाशा चाचण्यांचे अहवाल तपास यंत्रणेकडे आल्यामुळे सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात स्वतः लक्ष घातल्याचे सांगितले जात असून तपास वेगाने पुढे नेला जात आहे.Manoj Jarange

Shocking Names to Surface in Mahadev Munde Murder Case, Claims Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या