विशेष प्रतिनिधी
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आरोपींनी अमानूषपणे मारहाण केली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ आरोपपत्रात जोडले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटही आता वाल्मीक कराड विरुद्ध आक्रमक झाला आहे.
शिवसेनेने शिंदे गटाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनाबाहेर महिला आघाडीने आंदोलन केले वाल्मीक कराड याला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे. तो कोणत्याही पदावरील असू दे. तो महायुतीमध्ये आहे की आणखी कुठे आहे ते आम्हाला माहीत नाही.
जोपर्यंत वाल्मिक कराड याला फाशी होत नाही तोपर्यंत शिवसेना आक्रमक भूमिका मांडेल, असे प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सांगितले.
म्हात्रे म्हणाले, ज्याप्रकारे काल आम्ही फोटो आणि व्हिडिओ पाहिले त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जण काल रात्री शांतपणे झोपला नाही.इतक्या क्रूरपणे हत्या करणारी ही वृत्ती नष्ट झाली पाहिजे. त्यामुळे त्याला फाशीच झाली पाहिजे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 80 व्या दिवशी सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपींनी संतोष देशमुख यांना अमानूषपणे मारहाण केली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ आरोपपत्रात जोडले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे.
Now Shiv Sena Shinde group is also aggressive against Valmik Karad
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल