विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला साधा नारळही फोडता आला नाही आणि अजित पवारांनाही तुटपुंजे यश मिळाले. ओबीसींना डावलून जरांगे पाटलांना साथ देणाऱ्यांना ओबीसी बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे,” अशी टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यावर केली आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कामगिरीवर बोलताना हाके म्हणाले की, छगन भुजबळ यांना प्रचारापासून दूर ठेवणे आणि धनंजय मुंडे यांना बाजूला करून बजरंग सोनवणे व क्षीरसागर यांना जवळ करणे अजितदादांना महागात पडले आहे. ओबीसी बांधवांनी हे सर्व जवळून पाहिले असून त्याचेच प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात उमटले आहे. “माने या न माने, पण ओबीसींनी आता पवारांना नाकारले आहे,” असा दावा त्यांनी केला.
पुणे महानगरपालिकेतील आकडेवारीचा दाखला देत हाके यांनी खळबळजनक दावा केला. “पुण्यामध्ये ४१ ओबीसी जागांपैकी ३० ते ३२ जागांवर मराठा-कुणबी उमेदवारांनी निवडणुका लढवून विजय मिळवला आहे. याचाच अर्थ ओबीसींचे आरक्षण आता केवळ कागदावर उरले असून प्रत्यक्षात ते संपले आहे,” असे ते म्हणाले. तिकीट देताना केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ पाहून गुंड आणि धनदांडग्यांना प्राधान्य दिले जाते, अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली.
“ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, त्या बाबासाहेबांचे नाव घेण्याची जर तुम्हाला लाज वाटत असेल, तर महाजन तुम्ही ‘नतदृष्ट’ आहात. तुम्ही पालकमंत्री म्हणून मिरवायच्या आणि मंत्रिमंडळात काम करायच्या लायकीचे नाही. भाजपने संविधानाची पायमल्ली सुरू केली असून, पक्ष फोडणे लोकांना विकत घेणे हे असे करत आहेत. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिले, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
OBCs Show Pawar Uncle-Nephew Their Place, Says Laxman Hake
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास