विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादा जिवंत असतानाच दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. फक्त अधिकृत घोषणा बाकी होती. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर केली जाणार होती, असा दावा शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राजेश टोपे यांनी केला आहे. Rajesh Tope
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, अजितदादांच्या उपस्थितीतच विलीनीकरणाचा निर्णय जवळपास झाला होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. अगदी शेवटच्या बैठकाही पार पडल्या होत्या. फक्त अधिकृत घोषणा बाकी होती, जी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर केली जाणार होती
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या गटाचे भवितव्य काय? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. Rajesh Tope
राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीने कुटुंबाला सावरले, त्यावरून दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अधिक वाढली आहे. जर विलीनीकरण झाले, तर सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात पक्षाचे नेतृत्व करू शकतात.
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान अध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विलीनीकरण हाेणारच असल्याचा दावा केला आहे. याबाबतची चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर अजित पवार यांचे विमान उतरत असताना भीषण अपघात झाला. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा अधिकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rajesh Tope claims that the NCP’s unity was sealed during Ajitdada’s time.
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ