विशेष प्रतिनिधी
नाशिक : कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले. आपला पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जात असेल तर ते आपण घ्यायचे का? असा सवालही त्यांनी केला. Nitesh Rane
नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सुचीचे प्रकाशन नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी ‘ ‘हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी खारघरला अशीच भूमिका मांडली.
आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती. तेव्हा मी बोललो, नंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही आता ही काही वाटत नाही. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत नाही बोलायचे का? मग पाकिस्तान, इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात त्यांनी येऊन सांगावे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोणीही हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. आता रमजान सुरू आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांचे दुकानं लागतील. तिथे एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवावा. एकही सापडणार नाही. त्यांच्या कुराणमध्ये लिहिले आहे की, काफिरकडून काही घ्यायचं नाही. त्यामुळे ते तसे वागतात. मग आम्ही जे करतो ते काय वेगळे आहे? मी कुराण 2 वेळा वाचले आहे. 10 टक्के जकात द्या, असे त्यात म्हटले आहे. तो पैसा जिहादसाठी वापरतात. इतरांचा धर्म कमी करून स्वतःचा धर्म वाढवावा, असे लिहिले आहे. आपला पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जात असेल तर ते आपण घ्यायचे का? असा सवाल राणे यांनी केला.
आता कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे दुकानावर नाव वेगळे होते. आतमध्ये अब्दूल बसलेला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशात कार्यक्रम सुरू करणार आहोत की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजे. मी इथे आमदार, मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून आलो आहे. कुंभमेळ्यात लक्ष ठेवा. कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमच्या राज्यात सर्वात कडक लव्ह जिहादचा कायदा असेल, असे नितेश राणे यांनी सांगितले.
Remove Any Stall Not Run by Hindus at Kumbh Mela”, Nitesh Rane Appeals
महत्वाच्या बातम्या