प्रजासत्ताक दिन तर साजरा करताय;मात्र ह्या तत्वांच आणि कायद्याचं पालन करताय का?

विशेष प्रतिनिधी

पुणे : २६ जानेवारी २०२६ रोजी आपण भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.मात्र तत्पूर्वी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या किती मूलभूत तत्वांचा आणि मूलभूत कायद्यांचं प्रत्येक भारतीय पालन करतो असा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारला तर नक्कीच याच उत्तर नाही असं असेल,मात्र येत्या २६ जानेवारी पासून या १० मूलभूत तत्वांच आणि कायद्याचं पालन प्रत्येक भारतीयाने केलं पाहिजे. Republic Day

अधिकारांइतकेच कर्तव्यही महत्त्वाचे आहेत. कारण जबाबदार नागरिकच मजबूत राष्ट्राची पायाभरणी करतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाने या दहा मूलभूत कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे काळाची गरज बनली आहे.

नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे

संविधानाचे पालन करणे व त्याच्या आदर्शांचा सन्मान करणे –

भारतीय संविधान, त्यातील मूल्ये, स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा आणि लोकशाही तत्वांचा आदर राखणे.

राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे –

देशाची ओळख असलेल्या प्रतीकांचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

भारताची सार्वभौमता, एकता व अखंडता जपणे –

देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि एकात्मतेसाठी सदैव सजग राहणे.

देशाच्या संरक्षणासाठी सज्ज राहणे व राष्ट्रीय सेवेसाठी तत्पर असणे –

आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती किंवा सामाजिक संकटाच्या वेळी देशसेवेसाठी पुढे येणे.

सामाजिक सलोखा व बंधुता वाढवणे –

धर्म, भाषा, जात, प्रांत, लिंगभेद न करता सर्वांमध्ये ऐक्य आणि समतेची भावना निर्माण करणे.

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे –

आपली परंपरा, कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जतन करणे.

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे –

वन्यजीव, जंगल, नद्या, तलाव आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे.

वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद व सुधारक वृत्ती विकसित करणे –

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचारांना प्रोत्साहन देणे.

सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे –

रस्ते, सरकारी इमारती, रेल्वे, बस, उद्याने यांचे नुकसान टाळणे व त्यांची काळजी घेणे.

व्यक्तिगत व सामूहिक उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे –

स्वतःचा व देशाचा विकास साधण्यासाठी सातत्याने प्रगतीकडे वाटचाल करणे.

जबाबदार नागरिकत्वाची गरज

आजच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. सामाजिक माध्यमांवरील गैरवापर, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सामाजिक तेढ यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी नागरिकांनी संविधानिक कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवकांच्या मते, शाळा-महाविद्यालयांमधून संविधानिक मूल्यांचे शिक्षण देणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यामुळे भावी पिढी अधिक जबाबदार आणि संवेदनशील बनेल.

Republic Day is celebrated, but do they follow these principles and laws?

महत्वाच्या बातम्या