विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Shahajibapu Patil फुकट प्रसिद्धीसाठी सध्या भडक बोलण्याचा उद्योग सुरू झाला आहे. अजितदादांच्या मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? असा प्रश्न करणाऱ्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना सुनावले आहे.Shahajibapu Patil
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी संशय व्यक्त केला होता. अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. त्या विमानात बॉम्ब होता का? असेही म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अजितदादा घराबाहेर पडण्यापासून विमानात बसेपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले पाहिजे, असे ते म्हणाले होते.Shahajibapu Patil
शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील चीक महूद येथे जिल्हा परिषदेसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, अजित पवार यांचा विमान अपघात हा तांत्रिक स्वरुपाचा व निव्वळ अपघात आहे. फरक एवढाच आहे की, नेमकी चूक विमानात होती की वैमानिकाची एवढेच समोर यायचे राहिले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेल्या व जगातील सर्वात सुंदर व चांगली विमाने पाहिलेल्या शरद पवारांनीही हा निव्वळ अपघात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करू नये.
शहाजीबापू पाटलांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात विशेषतः सांगोल्यात महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचेही स्पष्ट केले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व शिवसेनेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळे यंदा सांगोला पंचायत समितीवर मागील 55 वर्षांपासून असणारी शेकापची सत्ता उलथवून महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
Shahajibapu Patil Slams Sonawane for ‘Provocative Remarks for Cheap Publicity’
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी
- Government identity : तृतीयपंथांना सरकारी “ओळख”;कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?
- CM Devendra Fadnavis : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प