राजकारण बंद करा, अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा वाद निरर्थक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

नागपूर : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या संदर्भात होत असणारा वाद हा अतिशय निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच राजकारण यात कसं पाहता येईल, हा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Devendra Fadnavis

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेतून काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनतेत लोकप्रिय असलेले नेते अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणे अत्यंत चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या घटनेतून राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. हे खालच्या पातळीचे राजकारण तात्काळ थांबले पाहिजे, असा कडक इशाराही त्यांनी दिला.



मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. तपासासाठी केंद्रीय पथक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरूनही चर्चा रंगल्या. मात्र, फडणवीसांनी स्पष्ट केले की, या सर्व घडामोडींमध्ये अनावश्यक राजकीय अर्थ लावणे योग्य नाही. दु:खद प्रसंगात संयम राखणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Stop politics, the controversy over Ajitdada’s plane crash is pointless, says CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या