Tanaji Sawant : तानाजी सावंत म्हणतात, आरोग्य विभागाच्या कामांन स्थगिती दिलीच नाही

Tanaji Sawant : तानाजी सावंत म्हणतात, आरोग्य विभागाच्या कामांन स्थगिती दिलीच नाही

Tanaji Sawant

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Tanaji Sawant  आरोग्य विभागाच्या कामांना राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा कोणत्याही पद्धतीने स्थगिती दिलेली नाही, असे स्पष्टीकरण माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant  ) यांनी दिले आहे. या विषयावर ते प्रथमच सविस्तर बोलले आहेतTanaji Sawant

सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून कामांच्या स्थगितीबाबत जो विषय सुरु आहे, त्या विषयाची माहिती घेणं गरजेचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता 3190 कोटींचा घोटाळा झाला, त्याआधी 108 गाड्याच्या बाबतीत 10 हजार, 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र, यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही. पण अभासी जगात जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचे. एखाद्याला बदनाम करायचं हे चुकीचं आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यति असे तब्बल 24 महिन्यांत 42 निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत.

माझ्या कार्यकाळात अनेक चांगली कामे केली असे सांगून सावंत म्हणाले, 70 कोटींत महाराष्ट्रातील 2500 हजार हॉस्पिटल साफसफाई करणं सोप्पं होतं का? वैद्यकीय विभागाची ऑर्डर झाली होती. माझ्या खात्याने 84 रुपये दर स्क्वेअरफुटने ठरवलं. हायकोर्टात आपलेच काही लोकं गेली. 12 लोकांनी कॉम्पिट केलं, वर्क ऑर्डर झाली, एमओयू झालं, महाराष्ट्र शासनातील एक रुपयाचाही कॉर्टक्ट दिलं. हॉस्पिटल मध्ये येणारा रोजंदारी करणारा वर्ग आहे. मोफत उपचार सुरू केले. अडीच हजार हॉस्पिटल स्वच्छता ही 70 कोटीत शक्य आहे का?

शासन म्हणून धोरणात्मक निर्णय घेण आमचं काम असतं. टोटल टेंडर 12 हजार कोटींचा असेल तर 12 हजार कोटी म्हणायचं. कुठेही एक रुपया खर्च झाला नाही. हायकोर्टाच्या आदेशाने निर्णय होईल सांगितलं. कुत्रा चावतो तर कुत्र्याला चावायचं का? मी कालही म्हटलं होतं संजय राऊतला मेंटल हॉस्पीटल मध्ये एक जागा रिक्त ठेवली. मी आजही सांगतो, प्रकाश आबिटकरांनी एक सीट ठेवावी”, असे तानाजी सावंत म्हणाले.

Tanaji Sawant says, the work of the health department has not been adjourned

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023