विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” या भावनेतून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात ऐतिहासिक युती झाल्याची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिकेच्या महासंग्रामासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असणार,” असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले, माझी एक मुलाखत झाली होती. त्यात मी असे म्हटले होते की, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे नाही सांगणार. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळण्याच्या टोळ्या फिरत आहेत. त्यात दोन टोळ्या आणखी ॲड झाल्यात. ते राजकीय पक्षांमधील मुले पळवतात.
जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईत. ती कधी आणि केव्हा भरायची ते कळवले जाईल. बरेच दिवसा ज्याची प्रतिक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि मनसेची युती झाल्याचे आज जाहीर करत आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
“उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल,” असे विधान करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बॅटिंग करताना राज ठाकरे म्हणाले, “त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. मुळात उत्तरे ही देवांना द्यायची असतात, दानवांना नाही.”
राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ फिरतोय, ज्यात ते अल्लाह हाफिज बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वावरून काही बोलू नये. माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचे खूप व्हिडिओज आहेत. ते काय बोलतात, त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील.
The mayor of Mumbai will be Marathi and will be ours, Raj Thackeray believes
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला