Ajitdada : अजितदादांच्या अंत्यसंस्कारात चोरांचा धुमाकूळ, २० लाखांचे दागिने लंपास; आंतरजिल्हा टोळी गजाआड

विशेष प्रतिनिधी

बारामती : Ajitdada राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बारामतीत घडलेली एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हजारोंच्या संख्येने जमलेल्या शोकाकुल गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी तब्बल २० लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली.Ajitdada

२८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर २९ जानेवारीला अजित पवार यांचे बारामतीत अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून राजकीय नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच गर्दीत आंतरजिल्हा टोळीने महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरून नेल्याचे तपासात उघड झाले आहे.Ajitdada



प्राथमिक तपासानुसार सुमारे २०.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणात रंजीत बालासाहेब जाधव, विश्वजीत तुपे, अंकुश दिघे, प्रशांत सपकाळ, विकास भगवत, रंजीत भोंगाळे यांच्यासह अनेक नागरिक बळी ठरले आहेत.

घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आंतरजिल्हा चोरी टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी बीड, यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेले दागिने आणि रोकड हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू असून, पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.

Thieves Strike at Ajitdada’s Funeral, ₹20 Lakh Ornaments Stolen, Inter-District Gang Nabbed

महत्वाच्या बातम्या