विशेष प्रतिनिधी
बीड : दीड वर्षांपूवीचा व्हिडिओ व्हायरल करून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस याना अडचणीत आणण्यात आले आहे. आमदार धस यांनी मारहाण करणारा कार्यकर्ता आपला असल्याचे मान्य केले आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. कुख्यात गुंड व भाजपा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली आहे. भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्यामुळे धस यांच्यावरही टीका होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस व आमदार सुरेश धस यांनी उत्तर द्यावे की हे काय आहे? हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यातील गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडीओ पाहा. याप्रकरणी अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
आमदार सुरेश धस यांनी मारहाण करणारा सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचं धस यांनी मान्य केलं आहे. ते म्हणाले, “ सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दिड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यानंतर मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा.
Trying to put MLA Suresh Dhas in trouble by making a video of one and a half years ago viral
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल