विशेष प्रतिनिधी
बीड : माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रवास करत असलेल्या अपघातग्रस्त विमानात बाॅम्ब हाेता का? असा खळबळजनक सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग साेनवणे यांनी केला आहे. Bajrang Sonawane
अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ कोसळले. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच हे विमान अपघातग्रस्त झाले. या विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशीतून काही बाबी समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काही शंका उपस्थित केल्या.
खासदार सोनावणे म्हणाले, “अजित पवारांच्या अपघाताबद्दल वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात ६ लोक होते, तर ५ मृतदेह का मिळाल्या? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. विमान वरच फुटले, वरच स्फोट का झाला?
अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झालेल्या या विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आल्याची माहिती समोर आली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला नाही, तर त्याला मानवी चुकाही कारणीभूत असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी अहवालावरून सुनावलेप्राथमिक अहवालाचे वृत्त समोर आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती. अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला व जनता मान्य करेल!. महाराष्ट्र पुरावा मागतोय DGCAनी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा.
Was there a bomb in Ajitdada’s plane? MP Bajrang Sonawane’s question
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक