विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange औरंगजेबाचा तुमचा काय संबंध? कशाला त्याला मानतो, निवडून येतो महाराष्ट्रात, आला उत्तरप्रदेश मधून, स्तुती करतो औरंगजेबाची, आयचं बधिर डोक्याचं अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर केली आहे.Manoj Jarange
जरांगे म्हणाले, विनाकारण मुस्लिम बांधवानी कुणाची स्तुती करू नये. तुम्ही आमच्या दैव दैवताला नाव ठेऊ नका. महिलांना त्रास देऊ नका. तुमचं कोणी वाकड करू शकणार नाही.
ते म्हणाले, औरंगजेब कुठून आला काय करायचं, ज्यांनी स्वतःच्या भांवडाची क्रूर हत्या केली, त्याची माया करण्याचे तुम्हाला काय घेणं पडलं. तुमचं पैगंबर साहेबाबद्दल वेगळं मत असेल ते ठीक. तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी. तुम्हाला तुमच्या मुस्लिम धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. मी कट्टर हिंदू आहे, मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे. गर्व आहे.
विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्याच्या शासन काळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता असे वक्तव्य केले होते. त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत असल्याने अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यावर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो, असे ते म्हणाले.
What is your relationship with Aurangzeb? Manoj Jarange’s criticism of Abu Azmi
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल