Devedra Fadanvis : सकारात्मक प्रचार, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, देवेंद्र फडणवीस म्हणाले हा नवा विक्रम

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devedra Fadanvis पूर्ण सकारात्मक प्रचार केला. सगळ्या सभांमध्ये मी विकासावर मत मागितली. तसेच आम्ही काय विकास करणार आहोत याची ब्ल्यु प्रिंट मांडली आणि याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच भाजपचे 3302 नगरसेवक निवडून आले असून हा नवा विक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.Devedra Fadanvis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांनी आमच्या विकास कामांवर दिलेली पावती आहे. आज देशात मोदींच्या नेतृत्वात भाजपबद्दल जी काही सकारात्मकता आहे याचा फायदा आम्हाला झालेला आहे. महाराष्ट्रात भाजपाचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले असून 3 हजारांपेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाला 2017 पेक्षा मोठा विजय मिळाला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे मोठे यश मिळाले. भाजपने 129 नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून महायुतीच्या तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते 75 टक्के आहेत. नगरसेवकपदावर भाजपने नवा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वीच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 1602 नगरसेवक होते, आता त्याच्या दुपटीचे 3302 नगरसेवक आहेत.Devedra Fadanvis



देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर ही जबाबदारी दिली होती. प्रत्येक विभागात आमचे जे नेते आहेत, चंद्रकांत दादा असतील, गिरीश महाजन असतील, मराठवाड्यातले नेते असतील, सर्वांनीच चांगले काम केले आहे. सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती, ती देखील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावली आहे. हा विजय आमच्या सगळ्यांचा आहे. लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

2014 पासून कोणतीही निवडणूक काढा, तेव्हा पासून झालेल्या सगळ्या निवडणुकीत भाजपने चांगला विजय मिळवला आहे आणि शहर आणि गावांच्या विकासावर आम्ही भर दिला आहे. भाजप हा सर्व जातींचा आहे आणि महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे. रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढलो तिथे आम्हाला चांगला यश मिळाले आहे, सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे आम्ही काही ठिकाणी हरलो, काही ठिकाणी जिंकलो. परंतु, आम्ही जिथे लढलो, तिथे आम्ही जिंकलोच आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता विरोधक हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत, असा टोला लागत देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारण त्यांना पराभव होणार हे माहीत होते. परंतु, भाजप किंवा महायुती म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो, कारण जे कार्यकर्ते आम्हाला विधानसभा किंवा लोकसभेत आम्हाला निवडून आणतात, त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही त्यांच्यासाठी गेलेच पाहिजे.

BJP Sets New Record With 3,302 Councillors, Fadnavis Says Votes Won Through Positive, Development-Focused Campaign

महत्वाच्या बातम्या