Marathinama : मराठी माणसाचा ‘मराठीनामा’ जाहीर; मराठी अभ्यास केंद्राचा पुढाकार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Marathinama मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्राने ‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा’ जाहीर केला आहे. परराज्यीय धार्जिण्या धोरणांवर आधारित राजकारणाला ठोस पर्याय म्हणून हा मराठीनामा मांडण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला. काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढणे ही घोडचूक असून त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागू शकतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.Marathinama

दादर येथील राजर्षी शाह सभागृहात बुधवारी झालेल्या जाहीर बैठकीत मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा मराठीनामा स्वीकारण्यात आला. मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला.Marathinama



मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सांगितले की, मराठीकारण केवळ घोषणांपुरते न ठेवता कृतीत उतरवण्यासाठी मराठीनामा आवश्यक आहे. मराठी जनतेचे खरे हित साधले जाते आहे का, याची सातत्याने पडताळणी व्हावी, ही या उपक्रमामागची भूमिका आहे.

या बैठकीला शिवराज्य ब्रिगेडचे अमोल जाधवराव, संयुक्त महाराष्ट्र समितीचे संयोजक सुहास राणे, अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठी हक्क, स्थानिक रोजगार, शिक्षण, संस्कृती आणि नागरी सुविधांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य देण्यावर मराठीनाम्यात भर देण्यात आला आहे.

‘Marathinama’ Unveiled for Marathi Identity, Marathi Study Centre Takes Lead

महत्वाच्या बातम्या