विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. साडेतीन वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर गावासह जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. Nasrapur
उन्हाळी सुट्टीसाठी आजीकडे आलेली ही चिमुरडी राम मंदिर परिसरात खेळत असताना आरोपीने आमिष दाखवून तिला जवळच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह गोठ्यातील शेणात लपवण्यात आला. बराच वेळ ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता हा भीषण प्रकार समोर आला.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गावकऱ्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला पकडले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत रास्ता रोको आंदोलन केले. आज नसरापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावची ही घटना केवळ गुन्हा नाही. ती आपल्या समाजाच्या विवेकाला हादरवणारी वेदना आहे. त्या ४ वर्षांच्या चिमुकलीसाठी न्याय हीच खरी लढाई… आणि ती शेवटपर्यंत लढली जाईल. राजकारण नव्हे, मानवता जिंकली पाहिजे, असे भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी म्हटले आहे.
3.5-Year-Old Toddler Sexually Assaulted and Murdered, Nasrapur Shutdown, Public Outrage
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन