Beed Assault Case : बीड अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीसह बालविवाहात सहभागी सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

पुणे : Beed Assault Case  बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी परिसरात घडलेल्या अल्पवयीन विवाहितेवरील अत्याचाराच्या धक्कादायक प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह बालविवाहासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.Beed Assault Case

रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या एका अल्पवयीन विवाहितेला आरोपीने घरातून उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडितेला रात्रभर गावातील चावडीवर दोरी आणि कापडाने बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अमानवीय घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Beed Assault Case

या घटनेची माहिती मिळताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तपासादरम्यान पीडिता अल्पवयीन असताना तिचा बालविवाह झाल्याचेही उघड झाले. त्यामुळे बालविवाह लावून देणारे, लग्नाला उपस्थित असलेले लोक तसेच कर्तव्यात कसूर करणारे स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.Beed Assault Case



या प्रकरणातील मुख्य आरोपी वैभव पटेकर याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेचा तपशील

१० मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडिता आपल्या पतीसोबत घरात झोपलेली असताना आरोपीने घरात घुसून तिचे तोंड दाबले आणि तिला जबरदस्तीने नदीपात्रात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला गावातील चावडीवर बांधून ठेवले आणि घटनास्थळावरून पसार झाला.

काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र सुरुवातीला कोणीही मदतीला आले नाही. अखेर तिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चावडीवर जाऊन तिची सुटका केली.

घटनेच्या धक्क्यामुळे आणि आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने सुरुवातीला दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर धैर्य एकवटून तिने आपल्या आई आणि मामासह पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Beed Assault Case: Orders to Book Main Accused and All Involved in Child Marriage

महत्वाच्या बातम्या