विशेष प्रतिनिधी
पुणे : Ravindra Dhangekar, आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून पत्नीला सातत्याने धमक्या व शिवीगाळ केल्याने मानसिक तणाव वाढून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना स्वारगेट परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तब्बल 14 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.Ravindra Dhangekar,
याप्रकरणी सुलताना खलिल शेख (वय ५०, रा. आशियाना रोशन बी बिल्डिंग, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल केदारी , सुनील अय्यर व त्यांचा मुलगा, रघू गौडा , सुनील बोरा, राजन सेठिया, हमीद भाई शेख व त्यांचा मुलगा, बाबासाहेब शेडगे व त्यांची पत्नी, रवींद्र धंगेकर व त्यांची पत्नी, तसेच शाम कोळेकर व शुभम नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Ravindra Dhangekar,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ पासून सुरू असलेल्या सेंट्रिंग व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरून आरोपींकडून फिर्यादींच्या कुटुंबीयांना वारंवार धमक्या, शिवीगाळ व मानसिक छळ केला जात होता. तसेच फिर्यादींच्या पत्नीचे सेंट्रिंगचे साहित्य जबरदस्तीने नेल्याचाही आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे खलिल रज्जुलाल शेख (वय ६५) यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी व व्हिडिओ तयार करून, १५ जुलै रोजी राहत्या घरी सिलींग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस करत आहेत.
Former MLA Ravindra Dhangekar, 13 others booked in businessman suicide case
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा