विशेष प्रतिनिधी
पुणे: शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका २९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर चालत्या गाडीत बलात्कार केला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Minor girl raped
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर हा पीडित मुलीच्या कुटुंबाच्या परिचयातील होता. १८ फेब्रुवारीच्या सकाळी नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना, पावणेसातच्या सुमारास आरोपीने मुलीला “मी तुला शाळेत सोडतो” असे सांगून आपल्या मोटारीत बसवले. ओळखीचा व्यक्ती असल्याने मुलीने आणि तिच्या आईनेही त्यावर विश्वास ठेवला. मात्र, आरोपीच्या मनात वेगळाच डाव होता.
त्याने आपली गाडी कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी थांबवली. तिथे त्याने मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, “हे कोणाला सांगितले तर तुला जिवे मारीन,” अशी धमकी देत त्याने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.
मुलीने धाडसाने दिली माहिती
या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी पूर्णपणे हादरून गेली होती. मात्र, तिने धीर एकवटून घरी परतल्यावर आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पोलिसांची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. ज्ञानेश्वर रायरीकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलीस उपनिरीक्षक तरडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Minor girl raped on the pretext of dropping her off at school
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती