विशेष प्रतिनिधी
पुणे: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ नीट यूजी ‘पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या पुण्यातील फिजिक्स विषयाच्या शिक्षिका मनीषा हवालदार यांनी तपासात कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी थेट नोट्स आणि प्रश्नसंच जाळून नष्ट केल्याचा खुलासा तपासात समोर आला आहे.
सीबीआयने सादर केलेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार या पुण्यातील सेट हिराला सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने त्यांची नीट वी ची परीक्षेसाठी फिजिक्स विषयातील पेपर सेटर म्हणून नियुक्ती केली होती. मनीषा हवलदार यांनी प्रश्नपत्रिकाशी संबंधित माहिती गुप्तपणे काही जणांपर्यंत पोहोचवली होती. त्यासाठी त्यांनी अत्यंत सिताफिने कट रचल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.
पतीच्या मोबाईलचा केला वापर..
मनीषा हवालदार यांनी स्वतःवर संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मोबाईलचा वापर टाळला होता. हवालदार यांनी आपल्या पतीच्या मोबाईल वरून नीट पेपर फुटी प्रकरणात सह आरोपी असलेल्या मनीषा मांढरे हिला प्रश्न आणि संबंधित माहिती पाठवली होती. हे संपूर्ण व्यवहारात व्हाट्सअप चॅटिंग चा वापर करण्यात आला, मात्र तपासाचा भाग आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांनी सर्व चॅट्स आणि मेसेज डिलीट केल्याचे आता उघड झाले आहे.
नोट्स जाळून केल्या खाक..
मनिषा हवालदार ने प्रश्नपत्रिकाशी संबंधित प्रव्य नष्ट करण्यासाठी स्वतः तयार केलेल्या फिजिक्सच्या नोट्स, प्रश्नसंच आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जाळून टाकल्याचे समोर आले आहे. मुळ्या संपूर्ण प्रकरणात पुरवनियोजन आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
सीबीआयने स्पष्ट केले आहे की, प्रश्नसंच पुरवण्याच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम स्वीकारण्यात आली होती. या व्यवहारात आणखी काही मध्यस्थी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आता सीबीआयकडून व्यक्त केला जात आहे.
NEET paper leak case stirs; Manisha Havaldar accused of burning notes, deleting chats, accepting cash
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश