MASAP Polls : मसाप निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन आघाडीचा विजय; मिलिंद जोशी यांच्या पॅनलचा पराभव

विशेष प्रतिनिधी

पुणे : MASAP Polls महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने वर्चस्व मिळवत विविध पदांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत योगेश श्रीनिवास सोमण कार्याध्यक्षपदी निवडून आले असून डॉ. स्वाती माधव महाळंक प्रमुख कार्यवाह, तर प्रदीप गजाननराव निफाडकर कोषाध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत.MASAP Polls

विद्यमान कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.

या निवडणुकीत एकूण १०,९०१ मतदान झाले होते. त्यापैकी १०,७१३ मते वैध ठरली, तर १८८ मते अवैध ठरली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योगेश सोमण यांनी ५,३६५ मते मिळवत मिलिंद जोशी यांचा ४५ मतांनी पराभव केला. मिलिंद जोशी यांना ५,३२० मते मिळाली.MASAP Polls



प्रमुख कार्यवाह पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत स्वाती महाळंक यांनी ५,४१४ मते मिळवत सुनीतराजे पवार यांचा पराभव केला. सुनीतराजे पवार यांना ५,२८५ मते मिळाली. कोषाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रदीप निफाडकर यांनी ५,५३६ मते मिळवत विनोद कुलकर्णी यांचा पराभव केला. विनोद कुलकर्णी यांना ५,१६८ मते मिळाली.

या निकालानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्य संवर्धन आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

साहित्य परिषदेत अनेक वर्षांनंतर सत्ताबदल झाला आहे. 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमिवर निवडणूक अतिशय महत्वाची आहे.

याशिवाय कार्यवाह पदांसाठीही सुनिल प्रभाकर महाजन, अंजली अशोक कुलकर्णी, सुनेत्रा रविंद्र मंकणी, प्रसाद अनंत मिरासदार, माधव सखाराम राजगुरु, डॉ. नितिन अरविंद संगमनेरकर आणि डॉ. आशुतोष प्रकाश जावडेकर निवडून आले आहेत.

पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून राजन बाबुराव लाखे, पुरुषोत्तम दत्तात्रय काळे आणि प्रभाकर शांताराम ओव्हाळ यांची निवड झाली.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जयंत तिपण्णा येलुलकर आणि गणेश लक्ष्मण भगत विजयी झाले.

धुळे जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजिव भगवानसिंह गिरासे यांची निवड झाली.

कोकण विभाग प्रतिनिधी म्हणून अरुण गजानन इंगवले निवडून आले.

नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून उन्मेष रामचंद्र गायधनी आणि प्रकाश केदुजी होळकर विजयी झाले.

सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून दीपक सदाशिव स्वामी (जंगम) यांची निवड झाली.

सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून नंदकुमार जगन्नाथ सावंत, अमरसिंह रणजितसिंह पाटणकर आणि अलका रवींद्र बेडकिहाळ विजयी झाले.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पद्माकर माणिकराव कुलकर्णी, कल्याण गोपाळ शिंदे आणि श्रुती श्रीनिवास वडगबाळकर यांची निवड झाली.

ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून भिकू नारायण बारस्कर आणि सुरेश चिंतामण देशपांडे विजयी झाले.

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून राजेंद्र उर्फ राजन अण्णासाहेब मुठाणे यांची निवड झाली.

तर जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून वासुदेव सोमाजी वले यांची निवड झाली आहे.

Power Shift in MASAP Polls: Sahitya Sanvardhan Panel Defeats Milind Joshi Group

महत्वाच्या बातम्या